WorldNewsUpdate : कुणाल राजपूतचे जागतिक रंगभूमीवर नाटकाचे सादरीकरण
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील युवा रंगकर्मी कुणाल मंगलसिंग राजपूत याने लंडन येथील ‘रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटीक आर्ट्स’ येथे भरातील निर्वासितांचा प्रश्न मांडणाऱ्या ‘होम’ नाटकाद्वारे रसिकांची कौतुकाची थाप मिळवली आहे. कुणाल लंडनमध्ये ‘रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटीक येथे नाट्यशास्त्राचे धडे घेत असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी आहे .
कुणाल लंडन येथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘राडा’ च्या वतीने आपली नाट्य कलाकृती सादर केली. जागतिक रंगभूमीवर वैविध्यपूर्ण प्रयोग करीत आहे. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या दोन्ही प्रयोगांना प्रयोग करीत आहे. लंडन येथे हाउसफुल्ल प्रतिसाद मिळाला. भारतीय आणि पाश्च्यात्य या दोन शैलीचा मिलाफ घडविण्याचा प्रयोग त्याने यानिमित्ताने केल्याने त्याचे कौतुक होत आहे. रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटीक आर्ट्स’ (राडा) या संस्थेत कुणालने मास्टर ऑफ फाइन आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या या यशाचे श्रेय त्याने ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शैली कमलाकर सोनटक्के, दिवंगत डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांना देतो त्यांच्याकडून कुणालने अभिनय आणि दिग्दर्शांचे धड़े घेतलेले आहेत.
आता कुणाल आपल्या मास्टरक्लासद्वारे विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण देत आहे. अभिनय आणि दिग्दर्शन त्याचे आवडते क्षेत्र आहे. आपल्या कलाविष्काराद्वारे कुणालने जागतिक रंगभूमीवर संधीची कवाडे खुली केली आहेत. यापूर्वी त्याने विद्यापीठाच्या एकांकिका महोत्सवात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कुणालचा यशस्वी प्रवास मराठवाड्यातील युवा रंगकर्मींसाठी नक्कीच प्रेरक ठरणारा आहे. त्याचे शालेय शिक्षण केम्ब्रीच शाळेत झालेले आहे. थेट लंडन येथे कुणाल आपल्या अभिनायाची आणि दिग्दर्शनाची चुणूक दाखवत असल्याने त्याचे अभिनंदन होत आहे.