Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : मोरोक्कोमध्ये भूकंपाने मोठ्या प्रमाणावर हाहाकार, 296 जणांचा मृत्यू , घरे झाली उद्धवस्त , बचाव कार्य जारी …

Spread the love

नवी दिल्ली : आफ्रिकन देश मोरोक्को येथे शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. या विनाशकारी भूकंपाचे वर्णन मोरोक्कोमध्ये गेल्या सहा दशकांतील सर्वात धोकादायक भूकंप म्हणून केले जात आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, भूकंपामुळे मोरोक्कोमधील शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्यामुळे मोरोक्कोच्या प्रमुख शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे सोडावी लागली आहेत. या विनाशकारी भूकंपामुळे युनेस्कोच्या वारसा स्थळांचेही नुकसान झाले आहे.

मोरक्कन गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भूकंपातील मृतांची संख्या 820 वर पोहोचली आहे तर 672 इतर लोक जखमी झाले आहेत. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, बहुतेक मृत्यू डोंगराळ भागात झाले आहेत जेथे मदत पोहोचणे कठीण होते. शुक्रवारी रात्री उशिरा मोरोक्कोच्या हाय अॅटलस पर्वतरांगांमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती.

युनेस्कोच्या वारसास्थळाचेही नुकसान झाले

अहवालानुसार, भूकंपामुळे युनेस्कोच्या हेरिटेज साइटचेही नुकसान झाले आहे. मोरोक्कोच्या माराकेश या जुन्या शहरात असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ जेमा अल-फना स्क्वेअरमध्ये मशिदीचा मिनार कोसळला. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या माराकेश शहरात राहणारा एक नागरीक ब्राहिम हिम्मी याने एजन्सीला सांगितले की, भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या आणि रुग्णवाहिका जुन्या शहरातून निघून गेल्यावर त्याने रुग्णवाहिका पाहिली.तो म्हणाला की, लोक घाबरले आहेत आणि दुसऱ्या भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पडले आहेत. भूकंपाशी संबंधित धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपामुळे मोठी हानी झाली

सर्व काही देवाच्या इच्छेनुसार आहे, परंतु आम्ही खूप त्रास सहन केला आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. ओल्ड माराकेश शहरातील रहिवासी जोहरी मोहम्मद म्हणतात, “भूकंपाच्या धक्क्यामुळे मला अजूनही झोप येत नाही. लोक जीव वाचविण्यासाठी पळताना पाहून त्रास होतो. जुन्या माराकेश शहरातील सर्व घरे जुनी झाली आहेत.” ट्राय, ऑस्ट्रेलियन पर्यटक यांनी सांगितले की , “अचानक खोली हलू लागली. आम्ही फक्त काही कपडे आणि आमच्या बॅगा उचलल्या आणि बाहेर पळत सुटलो,”

भारतीय वेळेनुसार, पहाटे 3 वाजून 41 मिनिटांनी मोरोक्कोत भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आफ्रिकेत झालेल्या गेल्या 120 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. USGS नं म्हटलं आहे की, 1900 पासून या भागातील 500 किमी परिसरात M6 किंवा त्यापेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. येथे एम-5 पातळीचे केवळ 9 भूकंप नोंदवले गेले आहेत.

जुन्या इमारती कोसळल्या, लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले

माराकेशमध्ये राहणारे नागरीक ब्राहिम हिम्मी यांनी एजन्सीला सांगितलं की, भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या. लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ते म्हणाले की, लोक घाबरले आहेत आणि पुन्हा भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पडले. भूकंपाशी संबंधित अंगावर शहारे आणणारे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेअर केले जात आहेत.

क्षणार्धात होत्याचं नव्हतं

भूकंपामुळे इमारती कोसळण्याच्या सर्वाधिक घटना माराकेशच्या जुन्या शहरात घडल्या आहेत. प्रशासनासह नागरिकांनीही कोसळलेल्या इमारतींचा मलबा हटवण्याचं काम सुरू केलं आहे. शहरातील प्रसिद्ध लाल भिंतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये एका भागात मोठ्या भेगा पडल्या असून काही भाग कोसळून त्याचा ढिगारा रस्त्यावर पडलेला दिसत आहे.

सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरोक्कोमधील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांपैकी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून अतिव दुःख झालं. या दुखःद प्रसंगी मोरोक्कोतील ज्यांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत, त्याच्याप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारत या कठिण काळात मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!