Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाची तारीख आली …

Spread the love

अयोध्या : जगभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमीवर भव्य अशा राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आपले असून येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे वृत्त आहे. या दिवशी राम ललांची गर्भगृहात प्रतिष्ठापनाही केली जाईल. अयोध्येत सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे उद्घाटन करतील. प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवडा आधीपासूनच पूजेला सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्णपणे तयार झाले आहे. तर, गर्भगृह यापूर्वीच तयार झाले आहे.

राम मंदिराचे ग्राउंड फ्लोअर पूर्ण पणे तयार झाले आहे. तर, गर्भगृहाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. राम मंदिराचे काम सुरू असतानाचे अनेक फोटो अयोध्येतून समोर आले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे जनरल सेक्रेटरी चंपत राय हे अनेक वेळा बांधकामासंदर्भातील अपडेट आणि फोटो शेअर करत असतात. या तयारीसाठी आज एक बैठक घेण्यात येत असून सायंकाळपर्यंत ती सुरू राहणार आहे. यानंतर समितीशी संबंधित अधिकारी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती जाहीर करतील. अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा व्यतिरिक्त, राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा आणि अयोध्येचे राजा बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा आणि L&T कार्यकारी मंडळाचे अभियंते या बैठकीत उपस्थित आहेत.

जगातील 160 देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण

श्री रामजन्मभूमी मंदिरातील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा संपूर्ण जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त मोठ्या आतुरतेने या मंदिराच्या उद्घाटनाची वाट पाहत आहेत. मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी श्री राम मंदिर तीर्थ क्षेत्राकडून देशभरातील धार्माचार्यांना आणि जगातील 160 देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.

ट्रस्टतर्फेमहिनाभर मोफत भोजन दिले जाईल.

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या अभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुमारे महिनाभर मोफत भोजन देण्याची ट्रस्टची योजना आहे. राय यांनी सांगितले की, जानेवारीमध्ये गर्भगृहात राम लल्लाच्या अभिषेक प्रसंगी ट्रस्ट एका महिन्यासाठी दररोज 75 हजार ते एक लाख भाविकांना भोजन पुरवेल.

सीएम योगी आणि पीएम मोदी यांच्यात बैठक

अयोध्या राम मंदिराच्या तयारीबाबत दिल्लीत ५ सप्टेंबर रोजी सीएम योगी आणि पीएम मोदी यांची बैठक झाली आहे. सीएम योगी यांनी पीएम मोदींना मंदिराच्या तयारीबाबत प्रेझेंटेशन दिले होते. राम मंदिर संग्रहालयासह अयोध्येचा विकास आणि राम मंदिर उद्घाटनाच्या तयारीची माहिती देण्यात आली. सीएम योगी स्वत: महिन्यातून अनेक वेळा पाहणी आणि बैठकांसाठी अयोध्येला भेट देतात.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!