#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
-
काश्मीर फाईल्सनंतर आता सध्या चर्चेत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चर्चेत आला आहे.
#Entertainment | विपुल अमृतलाल शाह यांचा आगामी चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या टीझरवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टीझरवर एफआयआर
-
#Entertainment | धारावी बँक या वेब सिरीजचे ट्रेलर रिलीज झाले आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. धारावी सारख्या वेगळ्या विषयावरील या सीरिजला नेटकऱ्यांची पसंती मिळेल. असा विश्वास नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
#TrailerOutNow #SunielShetty #VivekAnandOberoi #SonaliKulkarni
-
विजय मल्ल्याची भूमिका साकारणार अनुराग कश्यप
#Entertainment | दिग्दर्शक कार्तिक के यांच्या आगामी चित्रपटामध्ये अनुराग कश्यप हा फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचे नाव फाईल नंबर 323 असे असणार आहे. या चित्रपटामधून विजय मल्ल्यासोबतच नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांची कथा देखील प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. अनुराग कश्यपने फाईल नंबर 323 बरोबरच ‘अकीरा’, ‘धूमकेतु’ आणि ‘मुक्काबाज’ या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तसेच छुरी या शॉर्ट फिल्ममध्ये देखील अनुरागनं काम केलं आहे.
-
अभिनेते नाना पाटेकर दोन वर्षानंतर कमबॅक
#Entertainment | अभिनेते नाना पाटेकर दोन वर्षानंतर प्रकाश झा यांच्या ‘लाल बत्ती’ या वेबसीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत. ‘लाल बत्ती’ (Laal Batti) या वेबसीरिजमध्ये सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणारी ही वेबसीरिज आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून राजकारणातील काही काळी सत्य उघडकीस येणार आहेत. या वेबसीरिजमध्ये नाना वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मेघना मलिक या वेबसीरिजमध्ये नाना पाटेकर यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टीझरवर एफआयआर
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी