Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खुशखबर! लोकसभा आचारसंहितेपूर्वीच १७ हजार पदभरतीचा निर्णय घेतला जाणार

Spread the love

राज्यात राज्य राखीव पोलीस बदली, तुरुंग प्रशासन आणि पोलीस विभागात 17 हजार पदांवर भरती होणार आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसेच जून-जुलैमध्ये भरतीला सुरवात होईल, असे नियोजन असल्याचे प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सध्या जिल्ह्याची लोकसंख्या वाढली असून गुन्हेगारीत देखील वाढ होत आहे. मात्र पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलिस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्याठिकाणी असणार आहे.

शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने राज्यभरात पोलिस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्याठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने 17 हजार पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली असून त्यातील सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे.

अशी होणार नवीन पदभरती

  • जेल शिपाई – १,९००

  • एमआरपीएफ – ४,८००

  • पोलिस शिपाई – १०,३००

  • एकूण – १७,०००

राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता २६ फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. प्रशिक्षण नोव्हेंबरमध्ये संपल्यानंतर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर जून-जुलैमध्ये सर्वांचीच एकाचवेळी परीक्षा होणार आहे. पहिल्यांदा मैदानी, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून-जुलैत घेतली जाणार आहे.

राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून पूर्वी १० प्रशिक्षण केंद्रांची क्षमता सहा हजार होती. मागच्यावेळी ही क्षमता आठ हजार ६०० करण्यात आली. आता ती आणखी पाच हजाराने वाढवायला सरकारने परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.

  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.

  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

 

पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघा.

 

विषय (Subject)      |    गुण (Marks)

  • अंकगणित – 20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी – 20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी -20 गुण
  • मराठी व्याकरण – 20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम – 20 गुण
  • एकूण गुण – 100

 

नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.

  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
  • खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

 

शारीरिक चाचणी (Male)

  • 1600 मीटर धावणे (Running) 30 Marks
  • 100 मीटर धावणे (Running) 10 Marks
  • गोळाफेक 10 Marks
  • एकूण गुण 50 Marks

 

शारीरिक चाचणी (Female)

  • 800 मीटर धावणे (Running) 30 Marks
  • 100 मीटर धावणे (Running) 10 Marks
  • गोळाफेक (4 किलो) 10 Marks
  • एकूण गुण (Total Marks) 50 Marks

महाराष्ट्र पोलीस भारती 2024 साठी वयोमर्यादा

  • Category (प्रवर्ग) Age (वय)
  • खुला 18 ते 28
  • मागास 18 ते 33
  • प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45
  • अनाथ उमेदवार 18 ते 33
  • भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45
  • खेळाडू 18 ते 38
  • पोलीस पाल्य 18 ते 33
  • गृहरक्षक 18 ते 33
  • महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33

माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!