Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : दुमदुमली आंळदी !! विठू नामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, , मुख्यमंत्रीही झाले सोहळ्यात सहभागी….

Spread the love

आळंदी :पंढरपूरच्या आषाढी वारीला दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उत्साहात सुरवात झाली आहे. यानिमित्ताने आज (२९ जून) आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. या पालखीमध्ये हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. आळंदीमधून पंढरपूरकडे जात असताना हजारो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपूरमध्ये पोहचतात.

दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आळंदीमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच वारकऱ्यांशी संवादही साधला.

यावेळी बोलताना “संत ज्ञानेश्वर महाराजांना मी नमन करतो. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यासाठी येण्याचं भाग्य मला लाभले. मी संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि विठुरायाकडे प्रार्थना करतो की, बळीराजा संकट मुक्त होवो. शेतकऱ्यांवरील सर्व संकट दूर होवोत. चांगला पाऊस होवो. तसेच राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो, अशी प्रार्थना मी करतो”, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले . तसेच इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदुषणमुक्त करण्यासाचे काम सरकारचे आहे. इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी ८०० कोटींची तरतूद नगर विकास विभागाने केलेली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितले.

आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला आहे. माऊलींच्या पालखीचे हे १९३ वे वर्ष आहे. इंद्रायणी काठावर लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता. आळंदीत वारकऱ्यांची मोठी गर्दी केली असून विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांचा यावेळी उत्साह पाहायला मिळातो आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!