Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

09. Nov. 2022 – Tuesday

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. Live Update

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


#MahanayakOnline | #NewsUpdate | Live Updates

 

 

#CurrentNewsUpdate | संजय राऊत यांना जामीन मंजूर

  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे ११ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होतील, तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उद्या सहभागी होणार आहे – अशोक चव्हाण

  • न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड देशाचे ५०वे सरन्यायाधीश

    न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड (Justice D Y chandrachudd) यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. डी. वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत. १० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या पदावरून निवृत्त होतील.

  • Buldhana : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाही, ही तर भाजप जोडो यात्रा : केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.

  • Mumbai : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामिनावर आज होणार निर्णय.

  • Nanded : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज तिसरा दिवस

  • Earthquake Live Update : एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपाचं केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमधील डोटीमध्ये घर कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झालाय.

  • Noida : लखनौ, कानपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक जिल्हे भूकंपाने हादरलेत… रात्री 8.52 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी होती तर मध्यरात्री 1.57 वाजता पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता 6.3 इतकी होती.

  • Delhi: उत्तर प्रदेशातील अनेक भागात मंगळवारी रात्री सुमारे पाच तासांच्या अंतराने दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. जमीन दुसऱ्यांदा जवळपास 20 सेकंद थरथरत होती. तर, एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपाचं केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमधील डोटीमध्ये घर कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झालाय.

Live Update

 

 

 


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!