#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
08. Nov. 2022 – Tuesday
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahanayakOnline | #NewsUpdate #LiveUpdates
-
अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे बारामतीत तीव्र पडसाद…
– अब्दुल सत्तारांचा आजचा बुलडाणा जिल्हा दौरा रद्द, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून अब्दुल सत्तार अज्ञातवासात
– अंबाजोगाई : : खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, सत्तार यांचा पुतळा व पन्नास खोके जाळून निषेध, सत्तार यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याची मागणी
-
हिंगोली : हिंगोलीत अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध, सत्तारांच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी
-
संभाजी राजे छत्रपती यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
– नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा ने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहीत सुरक्षा वाढवून देण्याची केली मागणी- इतिहासावर आधारित चित्रपटांवर संभाजी राजेंनी आक्षेप घेतल्याने त्यांची सुरक्षा वाढवून देण्याची केली मागणी- चित्रपट सृष्टीवर माफिया अंडरवर्ल्ड मधील गुंडांचा वरचष्मा असल्याने संभाजी राजेंना धोका निर्माण झाला असून त्यांच्या सुरक्षित वाढ करून द्यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे
-
नांदेड – राहुल गांधी यांची यात्रा थांबली. ८ ते ९ किलोमीटर चालून अटकळी येथे यात्रा थांबली. दुपारी ३ वाजता यात्रेला होणार सुरुवात….
-
नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज जिल्ह्यातील दुसरा दिवस, आणखी तीन दिवस ही यात्रा जिल्ह्यात असणार
-
कोल्हापूर : महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाला नेसरीकरांचा विरोध, वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाला विरोध, चित्रपटामध्ये वीर योद्ध्यांची नावे बदलल्याचा आरोप, नेसरी खिंडीत झाले होते प्रतापराव गुजर आणि सात मराठ्यांचं युद्ध, नेसरीकर ग्रामस्थ आज मोर्चा काढणार
#LiveUpdates | गल्ली ते दिल्ली
-
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे वेळापत्रक
Bharat Jodo Yatra : महाराष्ट्र, नांदेड जिल्हा : मंगळवार, दि. ८ नोव्हेंबर २०२२ : स. ७.३०: वन्नाळी गुरुद्वारा येथून पदयात्रा प्रारंभ, स. ७.४०: वन्नाळी, स. ८.१०: लख्खा फाटा, स. ८.४५: वझरगा (अटकळीजवळ) येथे राखीव. दु. ३.००: खतगाव फाटा येथून पदयात्रा प्रारंभ, दु. ४.००: केरुर, सायं. ५.००: बिजूर फाटा, सायं. ५.३०: भोपाळा येथे कॉर्नर मिटिंग, शंकरनगर रामतीर्थ येथे मुक्काम