Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : बस – बुलेटच्या भीषण अपघातात तीन तरुण ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

बीड :  सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर  बुलेट आणि बसच्या भीषण अपघातात बुलेटवरून जाणाऱ्या तीन मित्रांचामृत्यू झाला आहे. बीड शहराजवळ धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाली येथील नक्षत्र हॉटेलसमोर रात्री 7 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, बुलेटवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका गंभीर जखमी तरुणास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisements

पारसनाथ मनोहर रोहिटे ( वय 22 राहणार, आहेरवडगाव, बीड) , कृष्णा भारत शेळके ( 23 रा . दगडी शहाजानपूर ता. बीड) , अक्षय सुरेश मुळे ( 22 रा . घोडकाराजुरी ता.बीड ) अशी मयतांची नावे आहेत. हे तिघे बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे बुलेटवरुन येत होते. यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या भरधाव बसने जोराची धडक दिली. यामध्ये पारसनाथ व कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अक्षयचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे तीन मित्रांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!