Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : अडीच लाखांचे सोने चोरणार्‍या आठ महिलांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

औरंगाबाद -शहरातील सराफ आणि साड्यांच्या दुकानात घुसुन खरेदीच्या बहाण्याने सोन्याचे दागिने आणि साड्या चोरणार्‍या आठ महिलांच्या टोळीला सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतले.व त्यांच्या घरातून अडीच लाख रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी आतापर्यंत पाच ठिकाणाहून मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आठ पैकी मिसारवाडीतील रहिवाशी असणार्‍या दोन महिला तर किराडपुरा, रोशनगेट, काचीवाडा, शहाबाजार या ठिकाणाहून सहा महिलांना ताब्यात घेतले. गेल्या ८जून रोजी या प्रकरणात सोने चोरीचा गुन्हा सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. वरील चोरट्या महिलांनी रंगारगल्ली व सराफाबाजारातून अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता.वरील कारवाई पोलिस निरीक्षक संभाजी पवार, अशोक भंडारे, एपीआय एम.एम. सय्यद पीएसआय काशिनाथ महांजोळ यांनी पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडेंच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

सातारा पोलिस ठाणे

सामाईक विहीरीतील पाणी भरण्याच्या कारणावरुन पुतण्याने काकाचा खुन करण्याचा प्रयत्न केला.समीर पठाण याचे वडील बादशाह पठाण यांच्यावर इम्रान त्याचे वडील अकबर आणि आई रजिया यांनी खुनी हल्ला केला होता.या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोघांविरुध्द दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.

गुन्हेशाखेने पकडला गांजाचा व्यापारी

शहरात एकेकाळी गांजाचा व्यापार करणारा कुख्यात मेहबूब पठाण याचा मुलगा मुरादखान रा.उस्मानपुरा याला ३किलो ५००ग्रॅ. गांजा सहित पकडले.ज्याची किंमत ३१हजार रु.असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरील कारवाई एपीआय मनोज शिंदे आणि पीएसआय योगेश धोंडे यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!