Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : २६ जून ला भाजपचे राज्यभर चक्काजाम आंदोलन

Spread the love

औरंगाबाद – पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी राज्य सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्ष येत्या २६जून ला आकाशवाणी चौकात सकाळी १० वा.चक्काजाम आंदोलन करणार आहे. असेच आंदोलन राज्यमर होणार असल्याची माहिती आ.अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या आडून राज्यसरकार आपली मनमानी करण्यात मश्गूल आहे. यावेळेस आम्ही आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. ती तर दूरच राहिली.पण पावसाळी अधिवेशन हे दोन दिवसात गुंडाळणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात असा आरोपही  यावेळी आ. सावे यांनी केला


ओबीसी समाजाचा इंपेरिकल डाटा राज्य सरकारने सर्वोच्चन्यायालयात वेळेवर दाखल न केल्यामुळे रद्द झालेले ओबीसी आरक्षणाला राज्य सरकार जबाबदार आहे अशी भूमीका भाजपची असल्याचे मत या वेळी खा.डाॅ.भागवत कराड यांनी बोलून दाखवले.राज्य सरकार मधले कॅबीनेट मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भूजबळ आपल्याच सरकारच्या विरोधात ओबीसी आरक्षण रद्ध झाल्याच्या निषेधार्थ मोर्चे काढतात.हे हास्यास्पद असून दोन्ही मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही खा.कराड यांनी केली. राज्य सरकारला ओबीसी समाजाचा इंपेरिकल डाटा जमा करणे फार अवघढ नाही.प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांकडून एका महिन्यात तो प्राप्त होऊ शकतो.पण राज्यसरकार याबाबतीत उदासिन असल्यामुळे गेले दीड वर्ष सर्वोच्च न्यायालयाला ओबीसी आणि मराठा समाजाचा डाटा देऊ शकले नाहीतअसा आरोप यावेळी खा.कराड यांनी केला.

या आंदोलनाचे नेृतृत्व खा.कराड आ.सावे आणि माजी महापौर घडामोडे करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला खा.कराड, आ.सावे, माजी महापौर घडामोडे, जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांची उपस्थिती होती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!