Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नाकाबंदीदरम्यान पोलिसांना अरेरावी करणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल  ; भामट्याने केला पोलिस असल्याचा बनाव

Spread the love

औरंंगाबाद : वाहनांसह मंगळसूत्र हिसकावण्याच्या गुन्ह्यामध्ये वाढ होऊ लागल्याने शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत नाकाबंदी सुरू आहे. त्यात दुचाकी पोलिसांनी दुचाकी अडवताच पोलीस असल्याचा बनाव करुन अरेरावीची भाषा करणा-या भामट्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना लिंबेजळगाव टोलनाक्यावर बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली.

वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळपासून नाकाबंदी सुरू होती. या नाकाबंदीदरम्यान विजय पंढरीनाथ घुगरकर (वय ४३, रा. ओमसाईनगर, कमळापूर) याला पोलिसांनी दुचाकीसह अडवले. त्यावेळी दुचाकीची तपासणी सुरू असताना घुगरकरने पोलिसांना मी पण पोलिसवाला आहे. तुम्ही येथे वाहने थांबवून लोकांना का त्रास देत आहे. असे म्हणून पोलिसांशी अरेरावी केली. तसेच पोलीस कर्मचारी शाम काळे यांची कॉलर धरुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यावरुन पोलिसांनी त्याला अटक केली. घुगरकर याच्याविरुध्द वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!