Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या पोलिस निरीक्षकास धक्काबुक्की

Spread the love

औरंंगाबाद : हॉटेलमध्ये जेवण करतांना सुरू असलेले भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून तीन ते चार जणांनी शिवूर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना सोमवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानक चौक परिसरात घडली. थेट पोलिस निरीक्षकालाच धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शिवूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे सोमवारी रात्री आपल्या मित्रासोबत जेवण करण्यासाठी सिडको बसस्थानक चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले होते. जेवण सुरू असतांना त्यांच्या बाजूच्याच्या टेबलवर जेवण करण्यासाठी आलेल्या युवकांमध्ये भांडण सुरू होते. ताईतवाले यांनी भांडणात मध्यस्थी करीत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते हॉटेलबाहेर येवून मित्राची वाट पाहत उभे होते. त्यावेळी हॉटेलमध्ये भांडण करणारे युवक बाहेर आले, त्यांनी ताईतवाले यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्या युवकांनी ताईतवाले यांना लोखंडी रॉडने मारहाण करून कारमधुन पळून गेले. जखमी झालेल्या ताईतवाले यांना उपचारासाठी एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात कोणाविरूध्दही तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!