Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वॅलेंटाईन डे निमित्त ऑनलाईन खरेदी करतांना काळजी घ्या पोलिसांचे नागरिकांना आवाहन

Spread the love

लवकरच येणाऱ्या वॅलेटाईन डे निमित्त ऑनलाईन खरेदी करतांना फसवणूकीचा प्रकार होण्याची शक्यता आहे. शहरवासीयांनी वॅलेटाईन डे निमित्त ऑनलाईन खरेदी करतांना काळजी घ्यावी असे आवाहन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी मंगळवारी (दि.२) केले आहे.
दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी वॅलेटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वॅलेटाईन डे निमित्त आपल्या प्रियजनासाठी भेटवस्तू घेण्यासाठी अनेकजण ऑनलाईन खरेदी करतांना दिसून येतात. गेल्या दोन ते तीन दिवसापासून वॅलेटाईन डे निमित्त खरेदी करणाऱ्यांना फ्री  गिफ्ट कुपन अथवा गिफ्ट कार्ड मिळत असल्याची लिंक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या लिंकसोबतच एका प्रतिष्ठीत पंचतारांकीत हॉटेलची लिंक देखील व्हायरल असून ती देखील बनावट आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंकवरून सायबर भामटे फसवणूक करण्याची शक्यता आहे.

शहरवासीयांनी ऑनलाईन खरेदी करतांना आपली वैयक्तीक कोणतीही माहिती लिंकवर देऊ नये, अनोळखी क्रमांकावरून आलेली लिंक उघडून बघु नये असे आवाहन गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे. तसेच कोणाची फसवणूक झाल्यास त्यांनी तात्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्वâ साधुन तक्रार द्यावी अशा सुचना देखील त्यांनी केल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!