Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत चार कोटी ९८ लाख रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त

Spread the love

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंबई व परिसरातील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या असून आठ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई घेण्यात आली. सर्व ठिकाणी मिळूण एकूण ४,९८,७४,९७३/- (चार करोड अठयान्नव लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर फक्त) रुपायांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून एकूण ९३ खाद्य तेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले आहेत. या धाडीत एकूण ३० अन्न सुरक्षा अधिकारी सामिल झाले होते.

राज्यातील जनतेच्या आरोग्याची प्रथम जबाबदारी लक्षात घेवून, त्यांच्या दैनंदिन आहारातील परिणामकारक अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची जाणीव लक्षात ठेवून प्रशासनास प्राप्त होणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे धाडी टाकल्या जातात. राज्यातील अन्न व्यवसायाचा दर्जा उंचावणे तसेच अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा देखील धाडीचा अन्य हेतू असतो.

दिनांक १६ जानेवारी, २०२१ शनिवार रोजी अश्याच नियोजनाचा भाग म्हणून मुंबई आणि ठाणे परिसरातील काही खाद्यतेल व्यवसायांवर धाडी घालण्यात आल्या. या धाडीत मुंबई परिसरातील १) मे. आयता एन्टरप्रायजेस प्रा.लि., बोरीवली (पश्चिम), मुंबई – ९२ २) मे. अष्टमंगल ऑईल मार्केटींग प्रा.लि.,गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ८६ व ठाणे परिसरातील ३) मे. सदानंद ऑईल टे्डर्स, वसई, जि. ठाणे, ४) मे. गौतम एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई, ५) मे. शिवशक्ती  एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई,  ६) मे. गॅलक्सी एन्टरप्रायजेस, काल्हेर, ता. भिवंडी, ७) मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर आणि ८)  मे. आशिर्वाद ऑईल डेपो, मिरारोड, जि. ठाणे या आठ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व ठिकाणी मिळूण एकूण ४,९८,७४,९७३/- (चार करोड अठयान्नव लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर फक्त) रुपायांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला व एकूण ९३ खाद्य तेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले.

धाडीचा उद्देश व परिणाम तपासता यावा म्हणून प्रथम प्राधान्याने विश्लेषण अहवाल मागवण्यात आले. तपासण्यात आलेल्या नमुन्यापैकी मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर या पेढीतुन घेण्यात आलेल्या १४ पैकी १४ नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले आहे. तसेच घेण्यात आलेल्या एकूण ९३ खाद्यतेलाच्या नमुन्यापैकी अप्रमाणित दर्जाचे ४९ नमुने आढळून आले व ४४ नमुने प्रमाणित दर्जाचे आढळून आले.

एकूण घेतलेल्या शेंगदाणा तेलाच्या ११ नमुन्यापैकी ०६ नमुने (५४.५५ टक्के) अप्रमाणित असल्याचे आढळून आले.

एकूण घेतलेल्या मोहरी तेलाच्या १९ नमुन्यापैकी १२ नमुने (६३.१६ टक्के) अप्रमाणित असल्याचे आढळून आले.

एकूण घेतलेल्या तीळ तेलाच्या ०५ नमुन्यापैकी ०५ नमुने (१०० टक्के) अप्रमाणित असल्याचे आढळून आले. एकूण घेतलेल्या सोयाबिन तेलाच्या ११ नमुन्यापैकी ११ नमुने (१०० टक्के)  प्रमाणित असल्याचे आढळून आले.

एकूण घेतलेल्या सूर्यफुल तेलाच्या २० नमुन्यापैकी १२ नमुने (६०.०० टक्के) अप्रमाणित असल्याचे आढळून आले. एकूण घेतलेल्या पामोलिन तेलाच्या १३ नमुन्यापैकी ०४ नमुने (३४.७७ टक्के)  अप्रमाणित असल्याचे आढळून आले.

एकूण घेतलेल्या कॉटनसिड तेलाच्या ०२ नमुन्यापैकी ०२ नमुने (१०० टक्के) प्रमाणित असल्याचे आढळून आले. एकूण घेतलेल्या कॉर्न तेलाच्या ०१ नमुन्यापैकी ०१ नमुने (१०० टक्के) प्रमाणित असल्याचे आढळून आले.

एकूण घेतलेल्या वनस्पतीचे ०१ नमुन्यापैकी ०१ नमुने (१०० टक्के) प्रमाणित असल्याचे आढळून आले. एकूण घेतलेल्या राईस ब्रान तेलाच्या १० नमुन्यापैकी १० नमुने (१०० टक्के) अप्रमाणित असल्याचे आढळून आले.

उपरोक्त कारवाई श्री शशिकांत केकरे, सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई  विभाग, अन्न व औषध प्रशासन, म.राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली  घेण्यात आली.

प्रमाणित आढळलेल्या खाद्य तेलाचा जप्तसाठा तात्काळ विक्रीसाठी खुला करण्याचे व अप्रमाणित  नमुन्या बाबतीत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्त, म.राज्य यांनी दिले आहेत.

वरील धाडीच्या आधारे महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागामध्ये खाद्य तेलाच्या दर्जाची सखोल तपासणी करण्याचे आदेश सर्व सह आयुक्तांना देण्यात आले असुन गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!