Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : नागरिकांच्या संतर्कने तोडलेले चंदनाचे झाड सोडून चंदनचोर पळाले…

Spread the love

देवानगरी येथिल अनिल जानकीराम कौलवार यांच्या घराच्या कंपाऊड वॉलमधे अंदाजे २०- २२वर्षाचे अंदनाचे २० फुट उंचीचे झाड आहे ह्या झाडास एक आठवड्यापुर्वी ( ४ डिसेंबर)चंदनचोर चंदनाचे झाड कापुन नेणेचा प्रयत्न करित होते. त्यावेळी नागरिकने वेळीच सावध झाल्याने चंदनचोराचा चंदन झाड चोरून नेणेचा डाव फसला.

आज बुधवारी पहाटे ३वाजेच्या सुमारास सारखे कुत्राचा भुंकणेच्या आवाजाने श्रीमंत गोर्डे पाटील जागे झाले आणि झाड करवातीने कापणेचा आवाज आल्याने हे चंदनचोर असल्याची खात्री झाल्याने गोर्डे पाटील आणि अनिल कौलवार यांनी संतोष जोशी, सुशिल कांकरिया,जालिंदर भालेराव, पंकज कुलकर्णी यांना फोन करून जागे करून आपण इतरांना फोन करून जागे करावयाचे सांगितले त्याप्रमाणे नागरिकांनी जोरजोराने शिटया वाजवून नागरिकांना जागेकरुन लगेच शेकडोनागरिक लाठ्या-काठयासह घराबाहेर पडले .चंदनचोरानी तोपर्यत चंदनाचे झाड तोडले आणि चंदन झाडाचे तुकडे करून चंदन तुकडे नेणेचा प्रयत्न करित असताना परिसरातील नागरिक आपणास घेरनेचा प्रयत्न करित असल्याचा चंदनचोराच्या लक्षात आल्याने त्यांनी तोडलेले चंदनाचे झाड सोडून पळाला लागले . नागरिक व चोरात ७०_८० फुटाचे अंतर होते आणि नागरिक त्यांच्या पाठलाग करित होते .चंदनचोर बंद असलेले रेल्वेगेट५४मधून जाबिंदा गाऊंडकडेपळवुन जाणेत यशस्वी झाले. यावेळी उस्मानपुरा पो.स्टे. ची वन मोबाईल घटनास्थळी येऊन पाहणी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!