Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : झेरॉक्सवर तयार करत होते बनावट नोटा , अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

औरंगाबाद – शंभर, दोनशे आणि २ हजार च्या बनावट नोटा हडकोत चलनात आणणार्‍या तिघांना सिडको पोलिसांनी सापळा लावून काल सध्याकाळी ५.३० वा. पकडले.त्यांच्या ताब्यातून २लाख ७६हजार ४५० रु.च्या बौगस नोटा आणि ९३ हजार ८००रु. चे प्रिंटर आणि इतर साहित्य असा ३ लाख ७० हजार २५०रु.चा मुद्देमाल जप्त केला. कोर्टाने आरोपींना ३दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संदीप श्रीमंत आरगडे(३२) रा. इटखेडा पैठण, धंदा ड्रायव्हर, निखील आबासाहेब संबेराव (२९) पहाडसिंगपुरा आणि आकाश संपती माने (३२) रा. धारुर अशी अटक आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील म्होरक्या आकाश माने असून त्याचे धारुर येथे ग्राहक सेवा केंद्र आहे. याच्याच ताब्यातून प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

काल संध्याकाळी(८ डिसें) ५ वा. टि.व्ही. सेंटर परिसरातील संजय गांधी मार्केट मधे आरगडे आणि संबेराव यांना बोगस नोटासहित अटक केली. तर तिसरा आरोपी माने याला धारुरला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडून आणले. आरगडे हा शिवनेरी ट्रॅव्हल्सवर ड्रायव्हर असून मुख्य आरोपी माने चा नातेवाईक आहे. तर संबेराव हा कमिशन बेसेसवर लोकांचे बॅकांमधून कर्ज मंजूर करुन देण्याचे काम करतो.गेल्या तीन महिन्यांपासून तिन्ही आरोपी बोगस नोटा तयार करतात.आतापर्यंत किती बोगस नोटा चलनात आणल्या याचा तपास पोलिस निरीक्षक गिरी करंत आहेत.

एटीएस ने ही या आरोपींची चौकशी करण्याची तयारी केली असून पोलिसआयुक्तालयाशी या संबंधी चर्चा केल्याची माहिती एटीएस ने दिली. वरील कारवाई पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक गिरी, पीएसआय बाळासाहेब आहेर,पोलिस कर्मचारी दिनेश बन, नरसिंग पवार, सुभाष शेवाळे, विजयानंद गवळी, गणेश नागरे यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!