Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने अर्णब गोस्वामीने याचिका घेतली मागे

Advertisements
Advertisements
Spread the love

रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी  याने दाखल केलेली याचिका स्वभावत: महत्वाकांक्षी असल्याचे दिसत असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटल्याने हि याचिका मागे घेण्यात आली . सुप्रीम कोर्टाने रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द करून या सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती मात्र न्यायालयाने या  याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

Advertisements

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात धक्का बसला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

Advertisements
Advertisements

रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात असून, याविरोधात गोस्वामी यांच्या रिपब्लिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जाण्यास मूभा दिली आहे.

“ही याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचं दिसत आहे. आपली इच्छा आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये. त्याचबरोबर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावं. यात हेच चांगले होईल की, आपण ही याचिका मागे घ्यावी,” असं न्यायालयानं सुनावलं. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!