Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangadCoronaVUpdate 6513 : दिवसभरात रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 3241 कोरोनामुक्त, 2972 रुग्णांवर उपचार सुरू, मृत्यूची संख्या 300

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 3241 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 115 जणांना सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 63, ग्रामीण भागातील 52 जणांचा समावेश आहे. आज एकूण 249 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 174, ग्रामीण भागातील 75 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 139 पुरूष, 110 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 6513 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 300 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2972 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

सायंकाळनंतर आढळलेल्या 53 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या आहे.) आहे.यामध्ये 29 पुरूष आणि 24 महिला रुग्णांचा समावेश आहे.
*औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (22)*
हडको (2), गजानन कॉलनी, गारखेडा परिसर (1), अविष्कार कॉलनी (1), प्रताप चौक (1), जाधवमंडी (2), मोतीवाला नगर (1), राजीव गांधी नगर, सिडको (1), नक्षत्रवाडी (1), सातारा परिसर (1) सुरळवाडी, हर्सूल (1), संभाजी कॉलनी (1), एन सहा सिडको (1), श्रद्धा कॉलनी (1), सावरकर कॉलनी, बजाज नगर (2), एकनाथ नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), भोईवाडा (1), बायजीपुरा (1), नारळीबाग (1)
*ग्रामीण भागातील रुग्ण (31)*
पोलिस स्टेशन परिसर,कन्नड (1), नागापूर, कन्नड (2), कन्नड (1), टिळक नगर, कन्नड (5), दिग्विजय सो., बजाज नगर (1), वाळूज (1), अजिंठा (8), दर्गाबेस, वैजापूर (10), शक्कर मोहल्ला, लासूर स्टेशन (1), साऊथ सिटी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
*घाटीत अकरा, खासगीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 3 जुलै रोजी जय भवानी नगर, मुकुंदवाडीतील 55 वर्षीय स्त्री, नक्षत्रवाडीतील हिंदुस्तान आवास येथील 78 वर्षीय पुरुष, नारळीबाग येथील 78 वर्षीय स्त्री, शाही नगर, गारखेडा येथील 65 वर्षीय स्त्री, फुले नगर, उस्मानपुऱ्यातील 52 वर्षीय स्त्री, दालावाडी, पैठण गेट येथील 55 वर्षीय पुरुष, अजिंठा, सिल्लोड येथील 78 वर्षीय स्त्री, आलमगीर कॉलनीतील 52 वर्षीय स्त्री, 04 जुलै रोजी बजाज नगरातील 55 वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील परतूर येथील 50 वर्षीय स्त्री, उस्मानपुरा, एकनाथ नगर येथील 64 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 233 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 227 कोरोनाबाधित वास्तव्यास होते.
तर शहरातील खासगी रुग्णालयात तीन जुलै रोजी नेहरू नगर येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा, अन्य एका खासगी रुग्णालयात रोशन गेट येथील 41 वर्षीय स्त्री आणि चार जुलै रोजी सातारा परिसरातील 37 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 227, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 71, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 300 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!