Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलीस कोठडी , मुलीचे नग्न फोटोही फेसबुकवर केले होते व्हायरल !!

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील एका १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून तिचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणात आरोपी अनिल पोपट चंदवाडे याला सोमवारपर्यंत (१० फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दिले.

Advertisements

पोलिसांनी या प्रकरणी दिलेली अधिक माहिती अशी कि , वैजापूर तालुक्यातील १९ वर्षीय विद्यार्थिनीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी ही शिक्षण घेण्यासाठी शहरात राहते. तिची ओळख आरोपी अनिल पोपट चंदवाडे (२१, रा. खापरखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याच्याशी झाली होती व तो तिच्याशी सतत मोबाइलवरून संवाद साधत होता. त्याला मोबाइलवर बोलण्यास टाळले तरी तो अधून-मधून कॉल करत होता.

Advertisements
Advertisements

दरम्यान, त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला म्हैसमाळ येथील लॉजवर नेले व जबरदस्ती अत्याचार केले आणि तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाइलमध्ये काढले. त्यानंतर अनिलने ते फोटो फेसबुक पेजवर अपलोड केले. हे फोटो तरुणीच्या चुलत भावाने पाहिल्यानंतर त्याने विचारणा केली. त्यावेळी अनिलने म्हैसमाळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे लक्षात आले. या प्रकरणात तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र अनिलने ज्या मोबाइलमधून फोटो काढला तो मोबाइल तरुणीला परत दिला. मात्र अनिलने तरुणीचे फोटो पुन्हा अपलोड केल्याचे निदर्शनास आल्याने तरुणीने तक्रार दिली व त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अनिल चंदवाडेला मंगळवारी अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले असता, मोबाईल तसेच गुन्ह्यातील दुचाकी जप्त करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील कैâलास पवार यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!