Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : भीसीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना ५१ लाखांचा गंडा, चार जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल

Spread the love

औरंंंगाबाद : भीसीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना ५१ लाख ३० हजार २५० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी गोविंदा कुरीजच्या चार जणांविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागीरथ राधाकिसन बजाज (रा.शिवाजीनगर), रिया वैभव बजाज (रा.शिवाजीनगर, )सय्यद मजहर खान, कुलदीप पालवे, दोघे रा.सातारा परिसर यांनी गोविंदा कुरीज या नावाने चिटफट फंड कंपनी  सुरु केली होती. गुंतवणूकदारांना २५० रुपये प्रतिदिवस असे ३३५ दिवस पैेसे गुंतविल्यास ४०० व्या दिवशी १ लाख रुपये मिळतील असे आमिष भागीरथ बजाज व त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना दाखविले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून शहरातील उत्तम खंडूजी कांबळे (रा.उत्तमनगर, जवाहरकॉलनी) यांनी १ लाख ४५ हजार २५० रुपये, सुरज दाभाडे यांनी ८ लाख रुपये, किरण उबाळे यांनी २ लाख ८६ हजार रुपये, ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी ९ लाख ५० हजार रुपये, सुधाकर घाटे यांनी २ लाख ५० हजार रुपये, राजेश झवर यांनी ७ लाख ३५ हजार रुपये, प्रकाश आंधळे यांनी ३ लाख ९५ हजार रुपये, कृष्णा ईधाटे यांनी १० लाख रुपये, कुशल शहाणे यांनी ६९ हजार रुपये, स्वाती शिंगटे यांनी ५ लाख रुपये असे एवूâण ५१ लाख ३० हजार २५० रुपये गोविंदा कुरीजच्या भीसीमध्ये ३० ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ या काळात गुंतविले होते.
दरम्यान, गुंतवणूकदारांचे पैसे न देता गोविंदा कुरीजचे संचालकांनी कार्यालयास टाळे लावून पोबारा केला. याप्रकरणी उत्तम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फसवणूक करणाNयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!