Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Cyber Crime : भामट्याने ऑनलाईन हडपले ९४ हजार रूपये तर विमानतळावरून लांबवली एक लाखाची सोन साखळी

Spread the love

औरंंंगाबाद : एचडीएफसी बँकेतून बोलत असून तुमच्या क्रेडीट कार्डाची लिमीट वाढवायची असल्याचे सांगून भामट्याने अशोक आनंदसा चिनगी (रा.चेतनानगर, उस्मानपुरा) यांच्या बॅक खात्यातून ऑनलाईनरित्या ९३ हजार ९०० रूपये काढुन घेतले. ही घटना ४ जानेवारी रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास घडली. अशोक चिनगी यांच्या तक्रारीवरून भामट्याविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव करीत आहेत.

विमानतळावरून सोन्याची साखळी लंपास

चिकलठाणा विमानतळावर राज्याचे रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचे स्वागत करण्यासाठी गेलेल्या रामनारायण बन्सीलाल मुंदडा (वय ६०, रा.जयभवानीनगर, ता.पैठण) यांच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीची साडेतीन तोळ्याचे सोन्याची साखळी चोरट्याने लांबवली. ही घटना ३ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चिकलठाणा विमानतळावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार सिताराम केदारे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!