Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangbad Crime : चौघांनी केली व्यापा-याची ८ लाख रूपयांची फसवणूक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : शहागंज परिसरातील लक्ष्मी होजीअरी या होलसेल दुकानातून माल खरेदी करून व्यापा-यास मालाचे पैसे न देता चार जणांनी ८ लाख २ हजार २६४ रूपयांचा गंडा घातला. भिमा बंजारा, तुफानसिंग गोरीलाल, हुकुमसिंग चत्रा, गुड्डूसिंग गोरू (सर्व राहणार बासगोन, ता.गरोड, जि. मन्दसोर, मध्यप्रदेश) यांनी २ ते ८ डिसेंबर २०१९ या काळात १५ दिवसाच्या कारारावर उधारीने होजीअरी व इतर कपड्यांचा माल खरेदी केला होता. नंतर चौघांनी खरेदी केलेल्या मालाचे पैसे रामकरण भागुराम कापडीया (वय ५२, रा. नवाबजानी गल्ली, गांधी पुतळा, शहागंज) यांची फसवणूक केली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक पाथरकर करीत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!