Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कंपनी व्यवस्थापकाविरुध्द अ‍ॅट्रॉसिटी

Spread the love

न्यायालयाच्या आवारात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका कंपनीच्या व्यवस्थापकाविरुध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गाडेकर असे व्यवस्थापकाचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते चेतन जनार्दन कांबळे (४४, रा. भावसिंगपुरा) यांनी २०१२-१३ मध्ये एससी कंपनीसोबत करारनामा केला होता. या करारनाम्यानुसार चैतन्य मागासवर्गीय संस्थेची जमीन व चेतन इन्फ्रा मिलेनियम गेटवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मशिनरी कंपनीला सहा लाख रुपये भाडे तत्त्वावर देण्यात आली होती. मात्र कंपनीने करारनाम्यानुसार मोफत सर्व्हिस व दुरुस्ती न केल्यामुळे कांबळे व कंपनीत वाद निर्माण झाला. २०१७ मध्ये कांबळे यांना कंपनीने करार रद्द करण्याची नोटीस पाठवली. त्यावरून कांबळे यांनी न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. त्या दिवाणी दाव्याच्या संबंधाने मंगळवारी कांबळे हे मित्र सचिन दाभाडे व भगवान शिरसाट यांच्यासोबत न्यायालयात गेले. न्यायालयाच्या गाभाºयात उभे असताना तेथे आलेला कंपनीचा व्यवस्थापक महेश गाडेकर याने जातीवाचक शिवीगाळ करुन तुमच्यासारख्या लोकांना व्यवसाय करता येत नाही. कंपनीच्या झालेल्या करारानुसार नादुरुस्त मशिनरी त्याच अवस्थेत घेतली असती. तर दोन वर्षाचा व्यवसाय बुडाला नसता असेही म्हणाला. या वादानंतर कांबळे यांनी वेदांतनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर करत आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!