Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विविध भागात विजेची चोरी करणा-यावर महावितरणची कारवाई सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंंंगाबाद : महावितरण कंपनीच्या  विजेच्या मिटरमध्ये पेâरफार करून विजचोरी करणा-या ग्राहकाविरूध्द महावितरणने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. महावितरणच्या भरारी पथकाने शहराच्या विविध भागात कारवाई करीत विज चोरी करणा-या ६ ग्राहकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

वीज चोरी करुन महावितरण कंपनीला २८ हजार २७० रुपयांचा चुना लावणा-या औरंगपु-यातील नांदेड टेरीकोट शॉप व केनान इलेक्टॉनिक या दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील १५ महिन्यांमध्ये दुकानादारांनी सुमारे पाच हजार ४५८ युनिटची चोरी केली आहे. तसेच सातारा परिसरातील लक्ष्मी कॉलनीत राहणा-या द्वारका अन्ना कोरडे व सुनिता सासवडे, शांतीनिकेतन कॉलनीत राहणारे शिवदास बनसोडे व भाऊसाहेब शिंदे या चौघांनी महावितरणची ८४ हजार ८९२ रूपये किमतीची  विज चोरी केली होती.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रविण भिमराव पाटील (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजेची चोरी करणा-याविरूध्द अनुक्रमे छावणी व सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणने सुरू केलेल्या या कारवाईमुळे विजेची चोरी करणा-यांत खळबळ माजली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!