Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : चौथ्या मजल्यावरून पडून रंगकामगाराचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या इमारतीचे रंग काम करणाऱ्या कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात क्रांती चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
भावसिंगपुरा येथील २८ वर्षीय सोहन जगदीश लांडगे हा रंगकाम करतो. मंगळवारी नेहमी प्रमाणे तो सकाळीच कामावर गेला होता. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतल्याळगत असलेल्या रवी सोनवणे यांच्या इमारतीचे रंगकाम सुरू आहे. त्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचे रंगकाम करावयाचे असल्याने तो दोरीच्या झुल्यावर काम करत होता. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक तोल जाऊन तो पडला. ही घटना घडताच बघ्यांची गर्दी झाली. नागरिकांनी तत्काळ लांडगे यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान रात्री ८ वाजता त्याची प्राणज्योत मावळली. या कामगारांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. विशेष म्हणजे सोमवारी (दि.९) त्याचा वाढदिवस होता. हा आनंद मावळत नाही तर त्याच्या जाण्याची माहिती मिळताच नातेवाईक, भावसिंगपुरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची नोंद क्रांती चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!