New Book : वाचावे असे काही : समाजशिल्पशास्त्रज्ञ सयाजीरावांची ओळख’ : संपादक : बाबा भांड/डॉ.राजेंद्र मगर

समाजशिल्पशास्त्रज्ञ : महाराजा सयाजीराव गायकवाड हे आधुनिक भारताच्या जडणघडणीतले एक शिल्पकार आहेत. त्यांच्या सुप्रशासनाच्या साहित्याचे प्रकाशन महाराष्ट्र शासनाने सुरू केले. बारा खंड दोन वर्षापूर्वी प्रकाशित झाले. उर्वरित खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या सोबत त्यांच्या संबंधीची कादंबरी, चरित्र, स्वातंत्र्ययोद्ध्यास मदत, इतिहास या संबंधीची मराठी, हिंदी, इंग्रजी, कानडी, गुजरातीत लहान मोठ्या वाङ्मय प्रकारात चाळीस पुस्तके साकेत प्रकाशन, सयाजीरावांच्या ट्रस्टने प्रकाशित केली आहेत.
प्रचंड दातृत्व दाखविलेल्या या देशप्रेमी प्रज्ञावंत राजांचे चौफेर क्षेत्रातील कार्य बघून काय वाचावे, हा वाचकांना प्रश्न पडतो. यासाठी सयाजीरावांचे सर्व क्षेत्रातील कार्याची वीस लेखातून परिचय व्हावा म्हणून ‘सयाजीरावांची ओळख’ हा नवा ग्रंथ आज प्रकाशित केलाय. २१६ पृष्ठांच्या ग्रंथाची विशेष सवलतीची किंमत १०० रुपये ठेवली आहे.
डॉ. शिरीष लांडगे, प्रा. योगेश्वर जाधव, डॉ. महादेव वाळुंज, पुनम नाईकनवरे, डॉ. अरुण कुमार मानकर, प्रा. दिनेश पाटील, प्रवीण मालुंजकर, सौरभ गायकवाड, मंदा हिंगुराव, डॉ. अमोल महाजन, डॉ. प्रमोद कुमावत, धारा भांड- मालुंजकर, डॉ. विशाल तायडे, संदीप जोशी, नामदेव आवताडे, डॉ. सुनीता बोर्डे, योगेश निकम, डॉ. राजेंद्र मगर आणि बाबा भांड यांचे महाराजांच्या वेगवेगळ्या कर्तृत्वासंबंधीचे लेख आहेत. हा ग्रंंथ सयाजीराव ट्रस्टने प्रकाशित केला असून ग्रंथाचे संपादक आहेत बाबा भांड आणि डॉ. राजेंद्र मगर. मुखपृष्ठ आहे विष्णू थोरे यांचे.