Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

New Book : वाचावे असे काही : अस्पृश्य जाती , ‘अस्पृश्यता निवारण’ हा विषय हाताळणारे पहिले होते महाराजा सयाजीराव गायकवाड

Spread the love

भारतात ज्यावेळी राजकीय स्वातंत्र्याचा प्रश्न राष्ट्रीय चळवळीच्या केंद्रस्थानी होता, त्यावेळी त्यासोबत ‘अस्पृश्यता निवारण’ हा विषय हाताळणारे पहिले होते महाराजा सयाजीराव गायकवाड.
विसाव्या शतकाच्या आरंभी, एकशे दहा वर्षांपूर्वी अस्पृश्यतेसारख्या अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नांवर सयाजीरावांनी इंग्रजीत गंभीर लेखन करावे, ही आज अविश्वसनीय वाटणारी गोष्ट आहे.


‘THE INDIAN REVIEW’ या मासिकाच्या डिसेंबर 1909च्या अंकात सयाजीराव यांनी लिहिलेला THE DEPRESSED CLASSES हा लेख म्हणजे आधुनिक भारतातील अस्पृश्यता निर्मूलनाचा पायाभूत दस्तऐवज आणि समतावादी जातीय ऐक्याचा जाहीरनामाच होय.

समाजशास्त्र ही ज्ञानशाखा भारतातील पदवी अभ्यासक्रमात प्रविष्ट होण्याअगोदर दहा वर्षे एक ‘देशी’ राजा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून असा निबंध लिहितो हेच मुळात अलौकिक काम आहे.
जगातील आठव्या क्रमांकाच्या श्रीमंतीचा उपयोग प्रचंड दातृत्वासाठी करणारा आणि जनकल्याणातच आपला मोक्ष शोधणारा हा प्रज्ञावंत राजा आपल्या प्रशासनात अस्पृश्यता निर्मूलनाच्या कायद्याची अंमलबजावणी करणारा पहिला सुप्रशासक होता.

एकशे दहा वर्षांपूर्वीच्या या लेखाच्या शेवटी सयाजीराव म्हणाले होते, ‘हे करोडो बांधव न्याय, आत्मसन्मान आणि मानवी हक्काने सक्षम व्हायला पाहिजेत.’
ही आजची गरज आहे. याकरिता या पुस्तकाचे प्रकाशन. हा ग्रंथ सयाजीराव ट्रस्टने प्रकाशित केला असून ग्रंथाचे संपादक आहेत दिनेश पाटील. मुखपृष्ठ आहे विष्णू थोरे यांचे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!