Aurangabad Crime : पत्नीने केली पतीची हत्या , मुलांच्यासमोर मध्यरात्री घरातच घडला थरार ….
मुलांच्या समोर पत्नीने चाकूने भोसकून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्य रात्रीच्या सुमारास औरंगाबाद शहरातील उल्कानगरी भागात हा प्रकार घडला आहे. पत्नीकडून पतीची अशी निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत. शैलेश राजपूत असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे.
शैलेश राजपूत, वय ४० यांचे वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये हिरा पॉलिमर नावाची कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद चालू होते. या कौटुंबिक वादातून हे दोघेही पती पत्नी स्वतःचे पैठण रोडवरील स्वतःचे घर सोडून मित्राच्या घरात भाड्याने राहावयास आले होते. काल रात्री कंपनीतून घरी आल्यानंतर शैलेश जेंव्हा एका व्यक्तीशी फोनवर बोलत होते तेंव्हा त्यांच्या दोघात वाद झाला आणि संतप्त पत्नीने त्याच्या जांघेवर चाकूचे वार केले आणि अति रक्तस्त्रावामुळे त्यांचे निधन झाले. यापूर्वीही तिने शैलेशचा अंगावर उकळते पाणी फेकण्याची घटना घडली होती. पूजाने एकत्र कुटुंबात राहत असताना शैलेशच्या आईविरुद्ध पोलिसात तक्रारही दिली होती.
पोलिसांच्या अंदाजानुसार रात्री घरात वाद झाल्याने पत्नीने रागात पतीची हत्या केली असावी . पत्नीने रागात चाकूने पतीवर वार केले. यात पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. घरात असलेल्या 6 वर्षाच्या चिमुकलीने नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती पत्नीमध्ये जेव्हा वाद झाला. तेव्हा घरात त्यांचा सहा वर्षाचा मुलगा होता. त्याच्यासमोरच दोघांमध्ये वाद शिगेला गेला आणि पत्नीने रागाच्या भरात पतीवर चाकूने वार केला. या हल्ल्यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. मुलाने फोन करून नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. तर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. पत्नीने टोकाचं पाऊल उचलत पतीची हत्या का केली याचं अद्याप कारण समजू शकलेलं नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून पतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.