अमरावतीच्या “हि” महिला ठरली “केबीसी “मधील १ कोटीची मानकरी !!
केबीसीचा हा अकरावा सीजन त्यात सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांमुळे अधिकच चर्चेत येत आहे. केबीसीच्या वतीने जरी करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये एक कोटी रुपये जिंकणाऱ्या महिलेची कहाणी सगळ्यात चर्चेचा विषय ठरली आहे. ही महिला अमरावतीमधली रहिवासी असून बबिता तडे असे त्यांचे नाव आहे.
बबिता या अमरावतीमधल्याच एका सरकारी शाळेमध्ये त्या मध्यान्ह भोजन तयार करण्याचं काम करतात. या कामाचा त्यांना महिन्याला अवघा दीड हजार रुपये मोबदला मिळतो. त्यांच्या घरची परिस्थिती कठीण आहे. त्यांचं एकमेव स्वप्न म्हणजे त्यांना स्वत:चा मोबाईल फोन घ्यायचा आहे. त्या म्हणतात, ‘मला स्वयंपाक करायला आवडतो. आणि मी जे काम करते, त्याची मला अजिबात लाज वाटत नाही.’ कौन बनेगा करोडपतीच्या ११व्या सीजनच्या १ कोटी जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या स्पर्धक ठरल्या आहेत. या आधी सनोज राज नावाच्या तरुणाने एक कोटी रुपये जिंकले होते.
बबिताच्या स्वप्नपूर्तीचा क्षणांना बघण्याची उत्सुकता सर्वांनाच निर्माण झाली असणार यात नवल नाही. येत्या बुधवारी हा भाग पाहावयास मिळणार आहे.