Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बीड जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड : कर्तव्यात कसूर , महिला फौजदारासह जमादार निलंबित

Advertisements
Advertisements
Spread the love

शेतीच्या वादातून पिंपरगव्हाण (ता. बीड) रोडवर तिहेरी हत्याकांड घडले. या प्रकरणात पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आले असून पोलीस अधीक्षकांनी महिला पोलीस उपनिरीक्षकासह जमादारास शनिवारी (२८) निलंबित केले. पोलीस उपनिरीक्षक  मनीषा जोगदंड, पोहेकॉ.राजेभाऊ वंजारे असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Advertisements

तिहेरी खून प्रकरणातील आरोपी असलेल्या कल्पेश किसन पवणे याने शुक्रवारी रात्री उशिरा आपल्या जीवाला धोका असल्याचा तक्रार अर्ज बीड शहर पोलिसात दिला होता. त्यावरून ठाणे अंमलदार असलेल्या वंजारे यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. परंतु कर्तव्यावर असलेल्यापोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांनी गैरअर्जदाराविरोधात तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. त्यांनी तात्काळ कारवाई न करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दोघांना निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!