कोकेनची तस्करी करणाऱ्या  २० वर्षीय ब्राझिलियन तरूणीला अटक

Spread the love

कोकेनची तस्करी करणाऱ्या  २० वर्षीय ब्राझिलियन तरूणीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अटक करण्यात केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाला (एनसीबी) यश आले आहे. तिच्याकडून सव्वा किलो कोकेन हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे सात कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.  एक तरुणी अंमली पदार्थांसह मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीचे अधिकारी तेथे तैनात होते. रिबेका रविवारी मुंबई विमानतळावर आली असता तिचीकडील बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात पांढऱ्या रंगाची पावडर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सापडली. प्राथमिक चाचणीत ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्याकडून एक किलो १८० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या मागे आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. तसेच मुंबईत ती कोणाला कोकेनचा साठा देण्यासाठी आली होती. याबाबत एनसीबी अधिक चौकशी करत आहे. रिबेकाकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सात कोटी रुपये असून याप्रकरणी रिबेकाविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटककरण्यात आली आहे. तिच्याकडे सापडलेले डॅग्सचा व्यावसायिक साठा आहे. एवढ्या साठ्यासह अटक झालेल्या व्यक्तीला २० वर्षांपर्यंत शिक्षा व दोन लाखांचा दंड एवढी शिक्षा होऊ शकते.  रिबेका अलेक्‍झान्ड्रा मेन्डेस असे अटक तरुणीचे नाव असून ती ब्राझीलमधील रहिवासी आहे. तिला इंग्रजी भाषा येत नसल्याचा दावा तिच्याकडून करण्यात येत असल्यामुळे तिची चौकशी करताना एनसीबीला अडचणी येत आहेत. तिने इंग्रजी भाषा येत नसल्याचा दावा करण्या आल्यामुळे स्थानिक भाषेचा जाणकारांच्या मदतीने तिची चौकशी करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *