Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत वि. ऑस्ट्रेलिया टी-२० : ऑस्ट्रेलियाची भारतावर मात

Spread the love

अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा ३ गडी राखून पराभव केला. दोन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली.ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताला ७ गडी गमावून केवळ १२६ धावा
करता आल्या. पण तरीही ऑस्ट्रेलियाची हे लक्ष्य गाठताना दमछाक उडाली. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पेलता आले.
के. एल. राहुलने ३६ चेंडूंमध्ये शानदार अर्धशतकी खेळी केली. धोनीने ३७ चेंडूंमध्ये २९ धावा पटकावल्या. पण राहुल आणि धोनी वगळता टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाने समाधानकारक कामगिरी केली नाही. नॅथन कल्टरने २६ धावा देऊन ३ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने ४३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ५६ धावा केल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!