Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवाल पाणी समजून प्यायला विषारी लिक्विड

Spread the love

भारतीय क्रिकेटपटू कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालची प्रकृती विमानातच बिघडल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्या आजारपणाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मयंक अग्रवाल आगरतळा येथे रणजी सामना खेळून आपल्या संघासह परतत होता. ३० जानेवारीला विमानात चढताच त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून तो सध्या आयसीयूमध्ये आहे.

या घटनेत मोठा खुलासा झाला आहे. पाणी समजून चुकून विषारी द्रव प्यायल्याचे मयंकने सांगितले असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हा द्रवपदार्थ त्याच्या सीटवर ठेवला होता, असेहीही मयंकने सांगितले. या घटनेनंतर मयंकच्या वतीने आगरतळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विमानात अचानक बिघडली तब्येत

कर्नाटक संघ गेल्या काही दिवसांपासून आगरतळा येथे होता, जिथे रणजी ट्रॉफी सामन्यात त्यांचा सामना त्रिपुरा संघाशी झाला. सामना जिंकल्यानंतर कर्नाटक संघ मंगळवारी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने दिल्लीमार्गे सुरतला रवाना झाला, जिथे त्यांचा पुढील सामना रेल्वे संघाशी होणार आहे.

कर्नाटकचे सर्व खेळाडू विमानात होते मात्र अचानक मयंकची प्रकृती खालावली. पीटीआयच्या वृत्तानुसार, मयंक अग्रवालने विमानात एका बॅगमधून काही द्रव प्यायले, पण नंतर त्याला तोंडात जळजळ जाणवली. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्रिपुरा पश्चिम एसपी किरण कुमार यांनी या घटनेबाबत पीटीआयला अधिक माहिती दिली. मयंक विमानात चढला तेव्हा त्याच्या सीटवर एक बॅग ठेवली होती. एसपी किरण कुमार यांनी मयंकच्या मॅनेजरच्या हवाल्याने सांगितले की, कर्नाटकचा कर्णधार मयकंने त्या पाऊचमधील द्रवपदार्थ पाणी समजून प्यायला.

मात्र थोडसं लिक्विड पिताच त्याच्या तोंडात अचानक जळजळ होऊ लागली. तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याची तब्येत बिघडल्याचे दिसताच, त्यालारुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मयंकच्या तोंडाला सूज आली होती आणि फोड आले होते’ असेही त्यांनी सांगितले.

पोलिस करणार तपास

मयंकच्या व्यवस्थापकाने हा कट असल्याचा संशय घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सध्या मयंकची प्रकृती धोक्याबाहेर असून तो स्थिर आहे. त्रिपुराच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून त्याची सखोल चौकशी केली जाईल.

मयंक बेंगळुरूला परतणार आहे

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मयंक 31 जानेवारीला बेंगळुरूला परत येऊ शकतो. आगरतळा रुग्णालयातील डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर तो परत येऊ शकतो.

रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकचा पुढील सामना २ फेब्रुवारीला होणार आहे. ही लढत रेल्वे विरुद्ध असेल. दोन्ही संघ सुरतमध्ये भिडतील. मात्र मयंकची तब्येत खालावल्याने तो पुढचा सामना खेळेल की नाही याबाबत आता शंका निर्माण झाली आहे.

मयंक अग्रवाल ४ वर्षांपासून भारतीय संघाबाहेर

मयंक अग्रवाल बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 5 फेब्रुवारी 2020 रोजी हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळला. मयंकने भारतीय संघासाठी आतापर्यंत 21 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मयंकने कसोटीत 4 शतकांसह 1488 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्याने केवळ 86 धावा केल्या आहेत.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!