Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

India vs Australia World Cup Final 2023 Live : विश्वचषकासाठी भारताचा ऑस्ट्रेलियासोबत आज महामुकाबला …ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला…

Spread the love

भारताविरुद्धच्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

नाणेफेकीनंतर एअर शो होईल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. याआधी नाणेफेक दुपारी 1.30 वाजता होईल. नाणेफेकीनंतर एअर शो आयोजित केला जाईल.

हजारो प्रेक्षक अजूनही स्टेडियमबाहेर आहेत

स्टेडियमबाहेर अजूनही हजारो प्रेक्षक उपस्थित आहेत. अनेक प्रेक्षक स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. मात्र हजारो लोक अजूनही बाहेर रांगेत उभे आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल.

टीम इंडिया स्टेडियमवर पोहोचली

भारतीय क्रिकेट संघ स्टेडियमवर पोहोचला आहे. स्टेडियमच्या आत आणि बाहेर प्रचंड गर्दी आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांसह खेळाडूंना स्टेडियममध्ये नेण्यात आले आहे. आतापासून ही स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. याआधी भारतीय हवाई दल एअर शो आयोजित करेल.

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा अहमदाबादला पोहोचली

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा अहमदाबादला पोहोचली असून  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी ती नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली  आहे.

अहमदाबाद : तब्बल वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने आले आहेत. यानिमित्ताने देशभरात अत्यंत उत्साहाचे वातावरण असून सामना पाहण्यासाठी क्रिकेट शौकिनांनी आधीच अहमदाबाद गाठले आहे तर स्टेडियम बाहेरही चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. 

गेल्या ४४ दिवसांपासून १० संघात सुरू असलेली स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाली आहे. भारतीय संघ ज्यांनी स्पर्धेत एकही लढत गमावली नाही आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया ज्यांनी सर्वाधिक ५ विजेतेपद आणि विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

आज देशभरात याच गोष्टीची चर्चा होत आहे की , रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का…? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार… ? या प्रश्नाचं उत्तर आज मिळणारआहे. विश्वचषकात भारताने सलग 10 सामन्यात विजय मिळवला असून गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिले. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे.

ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (C), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क

भारतीय संघ : रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 150 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचं पारड जड आहे. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक विजय मिळाले आहेत. कांगारूने एकूण 83 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने 57 विजय मिळवले आहेत. उर्वरित सामने अनिर्णित राहिले. बरं, दोन्ही संघांमधील गेल्या 5 सामन्यांवर नजर टाकली तर भारतीय संघानेच वर्चस्व गाजवले आहे. टीम इंडियाने तीन सामने जिंकले आहेत. आजचा अंतिम सामना ज्या मैदानावर होणार आहे, त्या मैदानावर हे दोन्ही संघ यापूर्वी तीनदा भिडले आहेत. येथेही टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!