Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बेपत्ता महिलेचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

Advertisements
Advertisements
Spread the love

बारामती येथील सांगवीमध्ये राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या एका विवाहित महिलेचा मृतदेह शेतात, झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तसेच, ही आत्महत्या नसून घातपात असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

Advertisements

सविता अप्पासाहेब सालगुडे (वय ४२, रा. सांगवी ता. बारामती) असे आत्महत्या केलेल्या मृत विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महिलेची आत्महत्या नसून संशयास्पद घातपात झाल्याची देखील सध्या चर्चा सुरू आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांच्या जमावाने संशयास्पद असलेल्या तरुणाला रस्त्यावर ओढत बेदम मारहाण केली आहे. संशयास्पद तरुणाला नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे महिलेची आत्महत्या नसून घातपात असल्याच्या चर्चा सुरु झाली आहे.

Advertisements
Advertisements
मृतदेह

तयार राहा … ३८ वास्तूंवर आणखी जीएसटी वाढणार

News Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!