अमरावती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

अमरावती मार्गावरुन, कोंडेश्वर रोड ते बडनेरा रस्त्यावर कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला. या अपघातात १८ वर्षांचा युवक आणि त्याची १७ वर्षीय मैत्रीण या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. युवतीने घरी कॉलेजला जात असल्याचे सांगितले होते, मात्र ती तरुणासोबत बाहेर फिरायला गेली असताना हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Advertisements

अमरावती कुंडेश्वर मार्गावरुन एका चारचाकी गाडीने आदित्य विश्वकर्मा आणि गौरी नामावली निघाले होते. आदित्य कार चालवत होता. यावेळी त्याने ट्रकला ओव्हरटेक करून कट मारला, त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनावर जाऊन त्यांची कार धडकली. कारमधून प्रवास करणाऱ्या गौरी नामावली आणि आदित्य विश्वकर्मा यांनी घटनास्थळीच मृत्यू झाला आहे, यावेळी पोलिसांनी अपघातग्रस्त झालेली कार जप्त केली आहे.

Advertisements
Advertisements

या घटनेची माहिती मिळताच गौरी व आदित्य या दोघांचेही नातेवाईक हिरवेंद्र रुग्णालय गेले. यावेळी गौरी व आदित्य यांच्या परिवारातील सदस्यांनी एकमेकांसोबत वाद घातल्याने चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गौरी कॉलेजला जात असल्याचे सांगून निघाली होती. मात्र यावेळी दोघेही फिरण्यासाठी गेल्याने हा अपघात झाल्याचे कुटुंबीयांच्या चर्चेतून समोर आले आहे.

 

#BorderDispute | महाविकास आघाडीच्या नेत्यांवर लाठीमार…

 

News Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!