Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : सहाशे रुपयांसाठी वृध्दाचा खून, दोघांना अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – दारु पिण्यासाठी वृध्दाकडील सहाशे रुपये हिसकावून त्याचा खून करणार्‍या दोघांना सिडको औद्योगिक पोलिसांनी तीन दिवसात बेड्या ठोकल्या. योगेश सर्जेराव खंडागळे(२७) व परमेश्वर बाबासाहेब खंडागळे(३०) दोघेही रा.निपाणी भालगाव शिवार अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Advertisements

या आरोपींनी गावातीलच बबन धुराजी शिंदे(६५) यांचा ८ डिसेंबर रोजी डोक्यात दगड घालून खून केला.मृतदेहाचा चेहरा ओळखू येत नव्हता पण खिशातील आधारकार्डावरुन मयताची ओळख पटली.या प्रकरणी मयताचा मुलगा सुदाम शिंदे(३६) याच्या फिर्यादीवरुन गून्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी तपासाची चक्रे फिरवली.सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पातारे यांच्या मदतीने आरोपींचा माग काढंत कारवाई पूर्ण केली.पोलिसउपायुक्त दिपक गिर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कारवाउ पूर्ण झाली.या कारवाईत एपीआय शिवाजी चौरे, पीएसआय सचिन जाधव,पोलिस कर्मचारी सुंदर्डे, वाहूळ, गोरवाल यांनी सहभाग घेतला

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!