Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : इंटरनेटवर लॉटरीच्या नावाखाली जुगार ,५० लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ अटकेत

Spread the love

औरंगाबाद :  सिडको येथे एन ५ परिसरातील संत तुकाराम नाट्यगृहाजवळ अंदाजे गेल्या १० वर्षांपासून सुरु असलेला इंटरनेट जुगार अड्डा सायबर पोलीस ठाण्याने उध्वस्त केला. या प्रकरणी ९ आरोपी अटक असून त्यांच्या ताब्यातून दोन कार, ५ मोटारसायकल १७ लाख रु. रोख असा ४९ लाख रु.चा मुद्देमाल जप्त केला. कृष्णा एजन्सी नावाने बोर्ड लावून जुगार खेळाला जातो अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर वरील कारवाई झाली

बाबासाहेब विठल खडके ,दामोदर नारायण खडके, बंडू कचरु जौक ,कृष्णां सुभाष डोंगरे , संतोष एकनाथ बनकर,प्रभाकर धोंडीबा भोसले,राजू गणपत पवार,ज्ञानेश्वर भाऊराव साळुंके,विशाल सुभाष गोल्डे अशी अटक आरोपीची नावे आहेत. यातील बाबासाहेब विठ्ठल खडके हा मास्टर माईंड असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. महाराष्ट्रात लॉटरी खेळण्यास परवानगी नाही. मिझोराम, सिक्कीम या राज्यातून महाराष्ट्रात लॉटरी खेळण्याची परवानगी मिळते. बाबासाहेब खडके ने infinitymax.com या २४ तास जुगारासाठी चालणाऱ्या वेबसाईटवर नागरिकांकडून पैशे घेऊन जुगार चालवत असे. मोबाईल वरून बाबासाहेब खडके ने fantacy ११ नावाचे एप डाऊनलोड केले. यातून तो राजरोसपणे जुगार खेळवत होता. व आठवडा भारताचे जुगारातून मिळालेल्या रकमेसह त्याचे सर्व साथीदार सिडकोत एकत्र येत होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या काळात शहर पोलिसांनी अशी एका कारवाई केली होती.

infinity.com हे एप इंटरनेटवर विविध प्रकारचे जुगार खेळण्यासाठी प्रसिधद आहे. करॅकेट सट्ट्या सहित अनेक जुगार खेळता येतात. वरील कारवाई पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्तां , पोलीस उपायुक्त अपर्णाला गीते, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पातारे, अमोल सातोदकर, पीएसआय चव्हाण, तांबे, वारे यांच्यासह पोलीस कर्मचारी शिल्पा तेलोरे, विजय घुगे, संदीप पाटील , प्रशांत साकला यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!