Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद :  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उद्या (ता. 17) सकाळी नऊला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्यानात सकाळी 8.45 मिनिटांनी आगमन होणार असून सकाळी 8.45 ते नऊ या वेळेत स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यात येईल. यानंतर नऊला ध्वजारोहण होईल. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री नागरिकांना संबोधित करतील व त्यानंतर ते निमंत्रितांना भेटणार आहेत.

Advertisements

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नागरिकांना घरून अनुभवता यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/AurangabadDIO या फेसबुक पेजवर, तसेच MCN या स्थानिक वाहिनीच्या (चॅनल क्र.122 व 523 (एचडी)) व युट्यूबवर MCN NEWS चॅनेलवरुन थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

Advertisements
Advertisements

ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रितांनी कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत राष्ट्रीय पोषाखात कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा परिषद इमारतीचे भूमिपूजन

दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्या (ता. 17) सकाळी 9.25 मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

विशेष निमंत्रित म्हणून खासदार सय्यद इम्त‍ियाज जलिल, सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संजय श‍िरसाठ, प्रशांत बंब, प्रदीप जैस्वाल, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नागरिकांना घरून अनुभवता यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/AurangabadDIO या फेसबुक पेजवर, तसेच MCN या स्थानिक वाहिनीच्या (चॅनल क्र.122 व 523 (एचडी)) व युट्यूबवर MCN NEWS चॅनेलवरुन थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

या कार्यक्रमास निमंत्रितांनाच प्रवेश असल्याने निमंत्रितांनी कार्यक्रम सुरू होण्याअगोदर 30 मिनिटे स्थानापन्न व्हावे. निमंत्रितांनी कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कटाक्षाने पालन करावे. तसेच कार्यक्रमस्थळी उपलब्ध केलेल्या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, मुख्‍य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, सभापती किशोर बलांडे, अविनाश गलांडे, अनुराधा चव्हाण, मोनालीताई राठोड, सर्व जिल्हा परिषद सदस्य आदींनी केले आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामातील’ वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचा, शौर्याचा, संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं महत्वं देशाच्या स्वातंत्र्यलढ्याइतकंच आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या, त्याग केलेल्या वीर सुपुत्रांचा देश नेहमीच ऋणी राहील. मी त्यांना वंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांचे स्मरण करुन राज्यातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मराठवाडा मुक्ती संग्रामदिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यासह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मराठवाड्यातील नागरिकांबद्दल, स्वातंत्र्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मराठवाड्याचा इतिहास संघर्षाचा राहिला आहे. हा संघर्षाचा वारसा कायम ठेवून भविष्यकाळात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला केलं आहे.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!