Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात , ७ हजार ६०३ नव्या रुग्णांची नोंद

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई :  राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात एकूण ७ हजार ६०३ नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण १५ हजार २७७ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण ५३ रुग्णांनी प्राण गमावेल आहेत. आजच्या ५३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख २७ हजार ७५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के एवढे झाले आहे.

Advertisements

दरम्यान राज्यातील सक्रिय  रुग्णांची संख्या १ लाख ०८ हजार ३४३ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १६ हजार ९२५ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १६ हजार ४८८ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या ११ हजार ७९४ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या ११ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या ११ हजार ०७२, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ९०४, रायगडमध्ये ३ हजार ६९२, रत्नागिरीत ३ हजार ४०१, सिंधुदुर्गात ३ हजार २१४, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३५४ इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार २९४ इतकी झाली आहे.

Advertisements
Advertisements

यवतमाळमध्ये फक्त २२ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, अहमदनगरमध्ये ३ हजार ४५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, औरंगाबादमध्ये ५९२, नांदेडमध्ये ही संख्या ४६६ इतकी आहे. जळगावमध्ये ६४०, तसेच अमरावतीत ही संख्या २५८ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २२ इतकी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!