Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात १२ हजार पदांसाठी मेगा भरतीची गृहमंत्र्यांची घोषणा

Spread the love

औरंगाबाद : पोलीस दलात सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच पहिल्या टप्प्यामध्ये पोलीस विभागात एकूण ५ हजार २०० जागांची पदभरती केली जाईल. तसेच यानंतर मेगाभरती केली जाईल,अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

“राज्यात पोलीस दलात एकूण १२ हजार २०० पदांसाठी मेगाभरती केली जाणार आहे. याची दोन टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये पोलीस दलामध्ये एकूण ५ हजार २०० जागांसाठी कोणत्याही परिस्थितीत पदभरती केली जाईल. तसेच यानंतर पुढे उर्वरित ७ हजार जांगाची भरती केली जाईल”, असे  वळसे पाटील म्हणाले. वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळस त्यांनी या भरती बाबत घोषणा केली.

मृताच्या कुटुंबियांना नोकरी

“पोलिसांना कर्ज देण्याची अनेक प्रकरण प्रलंबित आहेत, त्याबाबत उपाय योजना करण्यात येत असून कोव्हीड काळात पोलिसांनी आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलं. या दरम्यान अनेक अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला. कोरोनामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याबाबत वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “मृतांच्या पाल्यांना नोकरी देण्याबाबत विचार सुरु आहे. कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांना देण्यात येणारी आर्थिक मदत ही आतापर्यंत अनेकांना मिळाली आहे” असे  पाटील यांनी म्हटले आहे.

आर्थिक आणि सायबर गुन्हे वाढत आहेत

दरम्यान सायबर विभाग सक्षमपणे काम करत नाही असे  दिसून येत आहेत. त्याबाबत तीन महिन्यात आढावा घेऊन, पुढील बदल केले जातील त्यावर मी स्वतः लक्ष घालेल”, असेही वळसे पाटीस यांनी यावेळेस नमूद केले . आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे नमूद करून ते म्हणाले कि ,  त्याबाबत चांगलं काम होणे अपेक्षित आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची बदनामी किंवा दोन समाजात तेढ निर्माण केले जातात, या गोष्टींवर भर देण्याची गरज आहे. काही जिल्ह्यांमध्ये चांगले काम झाले आहे. काही ठिकाणी कामगिरी सुधारण्याची गरज आहे तसे निर्देश दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!