Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्य शासनाच्या कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन प्रणाली सुरू; अर्ज प्रक्रिया झाली सुलभ आणि पारदर्शक

Spread the love

लातूर, (अरुण जे कांबळे) : महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य मानले जाते. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती आणि संस्थांचा विविध पुरस्कारांनी सन्मान केला जातो.

यामध्ये Dr. Punjabrao Deshmukh Krishiratna Award, Vasantrao Naik Krishibhushan Award, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी Padmashri Dr. Vitthalrao Vikhe Patil Krishi Sevaratna Award यांचा समावेश आहे. हे पुरस्कार माननीय राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान केले जातात.

पूर्वी या पुरस्कारांसाठी चार प्रतींमध्ये ऑफलाइन प्रस्ताव सादर करावे लागत होते. त्यामुळे अर्जदारांना खर्च व वेळेचा अतिरिक्त भार सहन करावा लागत होता. प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी आणि संकलन प्रक्रियेसाठीही मोठा कालावधी लागत होता.

या अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने पुरस्कार प्रस्ताव प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणाली विकसित केली आहे.

ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in उपलब्ध असून ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये अर्ज करता येणार आहे. या डिजिटल प्रणालीद्वारे पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार आहे.

ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये अर्ज करता येणार आहे. या डिजिटल प्रणालीद्वारे प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन आणि अहवाल निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून कार्यक्षमता आणि विश्वासार्हता अधिक मजबूत होणार आहे.

शेतकऱ्यांना होणारे प्रमुख फायदे

  • घरबसल्या ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा

  • चार प्रती प्रस्ताव तयार करण्याचा वेळ व खर्चाची बचत

  • एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची गरज नाही

  • अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहण्याची सुविधा

  • छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्चात बचत

सन २०२५ पासूनचे विविध कृषी पुरस्कारांसाठी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था आणि गटांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनीही पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!