Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रात सीईटी परीक्षेच्या तारखांचे सुधारित वेळापत्रक जारी, बघा परीक्षा कधी होणार?

Spread the love

महाराष्ट्रात सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. MHT CET परीक्षांच्या वेळापत्रकारत बदल करण्यात आला असून, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र यांनी MHT CET 2024 च्या परीक्षेच्या तारखांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यासंदर्भात अधिकृत नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक MHT CET च्या अधिकृत वेबसाइट mahacet.org वर पाहू शकता.

महाराष्ट्रात सीईटी परीक्षा कधी होणार?

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र यांनी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पीसीबी गटाची सीईटी परीक्षा 22, 23, 24, 28, 29 आणि 30 एप्रिल 2024 रोजी होणार असून पीसीएम गटाची परीक्षा 2, 3, 4, 5, 9, 10, 11, 15 आणि 16 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

यापूर्वी पीसीबी ग्रुपची परीक्षा 16 एप्रिल ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत होणार होती आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा 25 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत होणार होती. परंतु आता लोकसभा निवडणुकांमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

या परीक्षांच्या तारखात करण्यात आले बदलल्या

केवळ एमएचटी सीईटीच नाही तर इतर परीक्षांच्या तारखांमध्येही देखील बदल करण्यात आला आहे. MAH AAC CET परीक्षेची सुधारित तारीख 12 मे 2024 आहे, तर MAH-B.A./B.Sc. बी.एड. (चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम), CET, MAH- L.LB. 5 वर्षे, CET (पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम) 17 मे 2024 रोजी आयोजित केला जाईल.

याशिवाय एमएच- नर्सिंग सीईटी 18 मे आयोजित केली जाईल, तर MAH-BHMCT CET 22 मे 2024 रोजी आणि MAH- B.BCA/BBA/BMS/BBM-CET 27 मे ते 29 मे 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

अधिकृत वेळापत्रक

  1. MAHACET च्या अधिकृत वेबसाईट mahacet.org ला भेट द्या.
  2. MHT CET 2024 परीक्षेच्या तारखा सुधारित वेळापत्रकावर क्लिक करा.
  3. एक नवीन PDF फाइल उघडेल जिथे उमेदवार वेळापत्रक बघू शकतात.
  4. पृष्ठ डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

या लिंकवर क्लिक करून पाहा वेळापत्रक

एमएचटी सीईटी प्रवेशपत्र 2024 परीक्षेच्या तारखेच्या सुरू होण्याच्या 10 दिवस आधी जारी केले जाईल. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी CET 2024 प्रवेशपत्र प्रवेश करण्यासाठी MHT CET लॉगिन क्रेडेंशियल्स – नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्रात काही तफावत आढळल्यास त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. परीक्षांच्या तारखा जाणून घेण्यासाठी आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://cetcell.mahacet.org/wp-content/uploads/2023/12/Revised_Due-to-electionsL22032024pdf.pdf

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!