ShivsenaNewsUpdate : शिवसेनेची यादी उद्या होणार घोषित , संभाव्य नावे अशी आहेत , औरंगाबादेतून …
मुंबई : काँग्रेसने आपल्या दोन याद्या घोषित केल्यानंतर उद्या शिवसेनेची यादी घोषित होणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीला त्यांना अपेक्षित असलेल्या ४ जागा आम्ही अजूनही तयार असून ते महाविकास आघाडीत येतील असा आम्हाला अजूनही विश्वास आहे .
दरम्यान काल प्रकाश आंबेडकर यांनी, आम्ही चार जागा परत करतो. त्याच्यावर त्यांनीच लढावे. आम्हाला चार जागा दिल्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र प्रत्यक्षात आम्हाला अकोला आणि उर्वरित दोन जागा ऑफर केल्या. त्यामुळे त्यांनी खोटे बोलणे थांबवावे, असे स्पष्ट शब्दात सांगितल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पहिली उमेदवारी यादी उद्या जाहीर करणार आहोत. या पहिल्या यादीत १५ ते १६ उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे मोठे नेते आहेत. ते आमच्यासोबत असावेत, अशी आमची नेहमीच इच्छा असते. आमचे प्रयत्न कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. मात्र, आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता. आता तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही, हे त्यांच्या हातात आहे. महाविकास आघाडीत चार ते पाच पक्ष सामील आहेत. त्यांना त्यांचा वाटा मिळायला हवा, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत…
वंचित बहुजन आघाडीला आम्ही दिलेला चार जागांचा प्रस्ताव चांगला आहे. ज्या जागा त्यांनी मागितल्या होत्या, त्या जागा आम्ही त्यांना दिल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले नाहीत, तरी आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत असते, तर हा विजय आणखी दैदिप्यमान झाला असता. मताधिक्य वाढले असते. परंतु, याचा अर्थ असा नाही की, आम्ही परावलंबी आहोत, असे संजय राऊतांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर सन्माननीय नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली आहे. त्यांनी हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता. पण तरीही आम्ही आशा सोडलेली नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
1. दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2. उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर
3. उत्तर पूर्व मुंबई – संजय दिना पाटील
4. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई
5. रायगड – आनंद गीते
6. रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत
7. ठाणे- राजन विचारे
8. उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
9. परभणी -संजय जाधव
10. सांगली – चंद्रहार पाटील
11. मावळ- संजोग वाघेरे
12. शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
13. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
14. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
15.औरंगाबाद -चंद्रकांत खैरे
16. यवतमाळ वाशिम संजय देशमुख