Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : हृदयद्रावक : बीड जिल्ह्यात सर्प दंशामुळे चिमुकल्या बहीण भावाचा करुण अंत !!

Advertisements
Advertisements
Spread the love

बीड : बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात कोयाळ गावात झोपेतच सख्या बहिण-भावाला सर्पदंश झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्पदंशामुळे सख्या बहिण भावाचा झोपेतच मृत्यू झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त केली जात आहे. कोमल मुंडे (वय 15) आणि शिवम मुंडे (वय 12) असे मृत बहिण भावाचे नाव आहे.

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात झोपेतच सर्पदंश झाल्याने सख्या बहिण भावाचा मृत्यू झालाय. ही घटना 24 मे रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली. सख्खे बहिण-भाऊ घरात झोपलेले होते. रात्री उशिरा त्यांना सर्पदंश झाला. सुरुवातीला दोघांनाही काही समजले नाही, परंतु त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचेपर्यंत दोघांचीही प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!