Maratha Reservation : जरंगे यांच्या प्रकृतीत सुधारणा; आजपासून जाणार तीन दिवसांच्या दौऱ्यावर

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी रात्री खालावली. त्यांच्यावर खासगी डॉक्टरांनी उपचार केले आहेत. जरंगे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते रविवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
शुक्रवारी रात्री मनोज जरंगे यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत छातीत कळ निघाल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्याचा ईसीजी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशक्तपणामुळे रात्री उशिरा सलाइन लावण्यात आले. शनिवारी सकाळही सलाइनही सुरू होते. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जरंगे रविवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर असतील.
सगेसाेयऱ्यांवर आम्ही ठाम आहाेत
जरांगे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. काहीही झाले तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार, सगेसोयऱ्यावर आम्ही ठाम आहोत. पोलिसांच्या माध्यमातून पोरांचा छळ सुरू आहे. माझ्या सहकाऱ्यांना विनाकारण बोलावून घेत बसवून ठेवले जात असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765