मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप उर्दू आणि अरबी भाषेतही करणार प्रचार

यूपी: लोकसभा निवडणुकीबाबत भारतीय जनता पक्ष सातत्याने आपली रणनीती मजबूत करत आहे. प्रत्येक वर्गाची मते एकवटणे हा पक्षाचा उद्देश आहे. दरम्यान भाजपने मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ते आता यूपीच्या मशिदी आणि मदरशांमध्ये प्रचार करणार आहे. रणनीतीचा भाग म्हणून या ठिकाणी आता उर्दू आणि अरबी भाषेत प्रचार केला जाणार आहे.
भारतीय जनता पक्ष आजपासून मुस्लिमबंधवांबाबत आपल्या नव्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. यासाठी भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप उर्दू आणि अरबी भाषेत प्रचार करणार आहेत.
त्यासाठी राज्यभरातील मशिदी आणि मदरशांमध्ये भाजपचा उर्दू आणि अरबी भाषेत प्रचार केला जाणार आहे. या भागात ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ची पोस्टर्स उर्दूमध्ये लावण्यात येणार आहेत. तसेच मुस्लिम समाजामध्ये उर्दू साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
भाजप आज राजधानी लखनौमधून या प्रचाराची सुरुवात करणार आहे. या मोहिमेची सुरुवात दर्गाह हजरत कासिम शाहीद येथून करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात पुस्तकाचे उर्दू भाषेत वितरण करण्याचीही तयारी करण्यात आली आहे.
भाजपच्या या नव्या मोहिमेबाबत अल्पसंख्याक मोर्चाचे म्हणणे आहे की, केंद्र सरकार ज्या प्रकारे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वासचा नारा देत चालत आहे, त्याला मुस्लिम समाजाचाही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच आता अरबी आणि उर्दूमध्येही पक्षाचा संदेश दिला जाणार आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना ते समजू शकेल आणि मत तयार होईल.
यावेळी भारतीय जनता पक्षाने ४०० चा टप्पा पार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी भाजपला सर्व समाजाच्या पाठिंब्याची गरज आहे. यूपीमध्ये भाजप आधीच मजबूत स्थितीत आहे पण तरीही अशा अनेक जागा आहेत जिथे मुस्लिम मतदार महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा स्थितीत त्यांच्या झुकण्याचा भाजपच्या मिशन 80 वर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच आता अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाने ही योजना आखली आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765