Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मंदिर प्रशासनाने जाणीवपूर्वक राहुल गांधींना फोटो घेण्यास नकरले…

Spread the love

राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेने १७ फेब्रुवारीला वाराणसीला पोहोचले होते. यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन आणि पूजाही केली. त्या दिवसापासून काँग्रेस पक्ष सातत्याने आरोप करत आहे की मंदिर प्रशासनाने जाणीवपूर्वक राहुल गांधींना फोटो घेऊ दिला नाही. हा वाद अजूनही संपत नाहीये. पुन्हा काँग्रेस पक्षाने राहुल गांधींसोबत गैरवर्तन झाले असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसने देवरियाचे आमदार शलभ मणी त्रिपाठी यांचा फोटो दाखवत गर्भगृहातून भाजप नेत्यांचा फोटो दाखवला आणि आमच्या पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो का घेऊ दिला नाही, असा सवाल केला आहे.

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात राहुल गांधी पोहोचल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने हा आरोप केला असून, आमच्या पक्षाचे सर्वात मोठे नेते आणि राहुल गांधी यांना मंदिर परिसरात अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केले असल्याचे सांगितले.

ही पूर्णपणे हुकूमशाही

काँग्रेसचे महानगर अध्यक्ष राघवेंद्र चौबे म्हणाले, 17 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसोबत वाराणसीत होते. यावेळी त्यांनी बाबा काशी विश्वनाथ याचे दर्शन घेतले. बाबा काशी विश्वनाथ मंदिरात गेले तिथे अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना गर्भगृहाचा फोटोही घेऊ दिला नाही.

भगवान काशी विश्वनाथ मंदिर संकुलात भाजपच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात गैरवर्तन केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वभूषण मिश्रा आणि शंभू शरण शर्मा दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ही पूर्णपणे हुकूमशाही वृत्ती असल्याचा आरोप काँग्रेसने केला. प्रशासनाने जाणीवपूर्वक त्याच क्षणी आमच्या कॅमेऱ्याची परवानगी रद्द केली आणि मंदिराचे पीआरओ फोटो काढून शेअर करतील, असे सांगण्यात आले.

परंतु, भाजप सरकारच्या दबावामुळे २४ तास एकही फोटो देण्यात आला नाही आणि मंदिर परिसराचा बाहेरचा फोटो देण्यात आला. याशिवाय देवरियाचे आमदार शलभ मणी त्रिपाठी यांचा फोटो शेअर करताना ते म्हणाले की, आमच्या नेत्याच्या कॅमेरामनची परवानगी रद्द असताना भाजप नेत्यांचा फोटो कसा आला.

काँग्रेस नेत्यांनीही मंदिर प्रशासनाला आवाहन करून यावेळी महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याचे सांगितले. अशा स्थितीत काशीवासीयांसाठी मंदिर परिसरात सहज दर्शनाची व्यवस्था असावी. यासाठी काशीतील रहिवाशांची ओळख त्यांच्या आधारकार्डवरून करून त्यांना दर्शनाची परवानगी देण्यात यावी.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!