Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिखर बँक घोटाळा प्रकरण: आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला ‘क्लोजर रिपोर्ट’. अजित पवार घोटाळ्यातून निष्कलंक होऊन बाहेर पडणार?

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. शिखर बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप असून अजित पवार हे या बँकेचे अध्यक्ष असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मात्र या कथित घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा (Closer Report) अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात केला आहे.

Advertisements

पोलिसांनी या प्रकरणात ‘सी’ समरी रिपोर्ट देखील सादर केला आहे. न्यायालयात याप्रकरणी येत्या 15 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांनी अर्ज सादर केल्यानंतर आता विरोधक या मुद्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तपास बंद करण्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

पुढील सुनावणीच्या दिवशी तो अहवाल न्यायालयासमोर येणार आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने जर हा अहवाल स्वीकारला तर अजित पवार या घोटाळ्यातून निष्कलंक होऊन बाहेर पडणार आहेत.

…त्यानंतर अजित पवारांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर 70 हजार कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजित पवारांनी भारतीय जनता पक्षासोबत संधान बांधून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर सिंचन घोटाळ्यातून ते बाहेर पडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता शिखर बँक घोटाळ्यातूनही ते निश्चित बाहेर पडतील, तेव्हा या घोटाळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता उत्तर दिले पाहिजे की, चक्की कोण पिसिंग? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई पोलिसांच्या अहवालाला आव्हान देणार

विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी तपास बंदचा अहवाल सादर केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे 15 मार्चला होणार आहे. मात्र या प्रकरणी आमच्या याचिका प्रलंबित असताना तपास यंत्रणांनी तपास बंदचा अहवाल कसा काय सादर केला असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वकील सतीश तळेकर यांनी केला आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!